+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

डायबेटिक फुट या विकारात मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ लागतात. एरवी आपल्याला जखम झाली तर कळते. मात्र, संवेदना कमी झाल्यावर जखम झाली की, त्याबद्दल कळतच नाही. त्यामुळे ती अधिक चिघळते. कालांतराने अल्सर होऊन त्यातून पाणी निघू लागल्यावर जखमेची जाणीव होते. कधी कधी पायांमध्ये आग होऊ शकते, ती दीर्घकालापर्यंत राहू शकते. वेळीच उपचार झाले नाही तर पाय कापावा लागू शकतो. सोबतच मधुमेह केवळ रक्तवाहिन्यांनाच नव्हे तर स्नायुंना व सांध्यांना देखील इजा पोहोचवतो. त्यामुळे पायाचा आकार सामान्यतः बदलतो. अशा वेळी अल्सर होण्याचा धोका संभवतो. दीर्घकालापासून असलेला आणि अनियंत्रित मधुमेह, त्यासोबत उच्चरक्तदाब आणि धुम्रपानाचे व्यसन, आणि वाढते वय यामुळे 'डायबेटिक फुट'चा धोका निर्माण होतो. पायाच्या संवेदना गेल्यानंतरही योग्य ती काळजी न घेतल्याने जखम झाल्यास डायबेटिक फुट विकारात गुंतागूंत र्निमाण होऊ शकते. कारण संवेदनेअभावी जखम झाली, हे ठाऊकच नसते. त्यामुळे पायात प्रादुर्भाव वाढत जातो. पाय हे सतत जमिनीच्या संपर्कात असल्या कारणाने तळपायांच्या जखमांमध्ये प्रादुर्भाव होणाचा धोका अधिक असतो. साधारण काम करताना किंवा अगदी चप्पल घालताना देखील पायांमध्ये जखम होते; एवढे पाय नाजूक झाले असतात. अनवाणी पायाने उन्हात चालल्यास पायाची कातडी भाजते. फोड येतात. पायाच्या संवेदना हळू-हळू कमी होऊ लागतात. ही लक्षणे घेऊन डाॅक्टरांकडे गेलात की, ते पायाचा आकार बदलला आहे का, त्यास सूज आली आहे का, जखम तर नाही ना झाली इ. बाबी शारीरिक तपासणी करून बघतात. याशिवाय एक्स-रे द्वारे हाडं आणि सांध्यांच्या तपासण्या करतात. जखम भरत नसेल तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा तर नाही याचीही तपासणी केली जाते आणि संपूर्ण तपासणीच्या आधारावर 'डायबेटिक फुट'ची तीव्रता ठरविली जाते. मधुमेह आहे, हे तर पूर्वीच कळालेले असेल तर आपण डायबेटिक फुटच्या संभाव्य धोके असलेल्या लोकांमध्ये येतो. मग अशा वेळी प्रतिबंधात्मक काळजी घेणे कधीही उत्तम होय. रोज सकाळी उठल्यावर पाय पूर्णपणे पडताळून पहावेत. त्यात अल्सर तर नाहीय्, भेगा किती झाल्यात, बोटांच्या फटीमध्ये फंगल इंन्फेक्शन दिसतेय का, या सगळ्यांची तपासणी करावी. कारण येथूनच प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. मधूमेह असल्यास पायाची त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे पायाला मॉईस्चरायजर लावणे केव्हाही उत्तम आहे. यासोबत घरात असताना देखील चपला आणि मोजे वापरावेत. बाहेर जाताना आरामदायी पादत्राणांचा वापर करावा. डायबेटिक फुट विकारात आयुर्वेदिक तसेच ओझोन उपचार पद्धतीत यशस्वी उपचार शक्य आहे. रक्तातील साखर नियंत्रित करून योग्य ते उपचार केल्यास अधिक चांगला प्रतिसाद मिळतो व जखमा लवकर भरून येतात. अधिक माहिती व उपचारांसाठी संपर्क डाॅ धंदुके यांचे गुरूकृपा क्लिनिक वडगाव मावळ गुरूकृपा आयुर्वेद आयुएस्थेटिक्स तळेगाव दाभाडे संपर्क 8856860463