+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
धावपळीच्या युगात व्यक्तीला अनेक शारीरिक आणि मानसिक ( Psychically and Mantel Diseases) आजारानं ग्रासलं आहे. त्यातल्या त्यात पाठदुखीचा आजार सर्वसामान्य झाला आहे. पाठदुखीचा (Back Pain) त्रास होत नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. सामान्य वाटणाऱ्या आजाराचा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आजाराच्या यादीत पहिल्या 12 आजारात समावेश होतो. सामान्य वाटणारी पाठदुखीची समस्या (Back Pain) दुर्लक्षित केल्यास कालांतराने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आपलं जगणं अक्षरश: वेदनादायी होऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी औषधोपचार, व्यायाम, अग्निकर्म, विद्धकर्म, कपिंग, कटि बस्ति, बस्ति मर्म चिकीत्सा इत्यादीं उपचारपद्धती डाॅ धंदुके यांच्या गुरूकृपा आयुर्वेद क्लिनिक वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे येथे उपलब्ध आहेत. संपर्क 8856860463 पाठीच्या मणक्याचे आजार मेंदूकडून संपूर्ण मांसपेशींना आदेश देण्याकरिता मणक्यामधून वात नाडय़ा, त्या त्या मांसपेशींना जात असतात. या मणक्यांमध्ये एक मऊ गादी असते. या गादीमुळे दोन मणके एकमेकांना घासले जात नाहीत व या वातनाडय़ा आपल्या संदेशवाहनाचे कार्य अव्याहतपणे करीत असतात. काही कारणाने ही गादी झिजली गेली की मणक्यांचे घर्षण सुरू होते व वातनाडीवर दाब पडून विविध लक्षणे निर्माण होतात. मानेपासून कंबरेपर्यंत कुठेहीही विकृती घडू शकते. परंतु मान व कंबर हे भाग सातत्याने तणावात असतात. हालचालीत असतात, फिरत असतात. म्हणून हे दोन भाग प्रथम घासले जातात. याच्या तीव्रतेवरून मणक्यांचे अनेक विकार निर्माण होतात. मग त्याला स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डली- लिस्यासिस इ. नावे आहेत. पाठीच्या मणक्यांमध्ये सहजासहजी अधिक आघात झाल्याशिवाय बदल होताना दिसत नाहीत. त्यामुळे या मणक्यांच्या गादीचे पोषण झाल्याशिवाय ही व्याधी बरी होणार नाही असे चित्र दिसते. मग केवळ वजन लावण्याने तात्पुरता ‘दाब’ कमी करून लक्षणे, वेदना कमी करणे व पुढे या व्याधीचा नायनाट करण्यासाठी शोध सुरू होतो. मणक्याचे आजार होण्यामागची कारणे दुचाकी वाहने : रस्त्यावरील गतिरोधक, रस्त्यातील खड्डे, दुचाकी वाहनांवर जास्त फिरणे या कारणांनी मणक्यांवर अधिक ताण पडून गादीला इजा पोहोचते. शरीरस्थ विकृत वात इतस्तत फिरून व्याधी बळावते. व्यायामाचा अभाव : काहीही कारण सांगून व्यायाम टाळण्याची अनेकांची वृत्ती असते. वरील सर्व कारणांनी वातवृद्धी होत असली तरी विशिष्ट पद्धतीने मणक्यांच्या स्नायूंना शिथिल करून त्यांच्यावरील ताण कमी करणारे साधे व्यायाम, योगासने केली तर मणके नादुरुस्त होण्यापासून वाचवता येतात. एवढेच नव्हे तर वजन वाढत असेल तर किमान नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. वाढणारी चरबी मणक्यांना अधिक दुर्बल करते. व्यायामाच्या सवयी लहानपणापासून लावल्याने पुढे त्रास होत नाही. ठरावीक साधनांचा, व्यायाम प्रकारांचा प्रयोग रोज केवळ १५ ते २० मिनिटे केल्यानेदेखील फायदा होतो. झोपण्याच्या पद्धती : मान तिरकी करून झोपणे, जेवणानंतर लगेच कोणत्याही स्थितीत झोपणे, मोठय़ा उशा घेऊन वाचत बसणे, तसेच झोपणे, मान मोडत बसणे, सतत मान हलवत रहाणे या कारणांनीच या व्याधी बळावतात. झोपतांना आपल्या शरीराच्या अवयवांचे भान ठेवून झोपणे गरजेचे आहे. उपचार औषधोपचार, व्यायाम, अग्निकर्म, विद्धकर्म, कपिंग, कटि बस्ति, बस्ति, मर्म चिकीत्सा इत्यादीं उपचारपद्धतीद्वारे डाॅ धंदुके यांच्या गुरूकृपा आयुर्वेद क्लिनिक वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे येथे यशस्वी उपचार केले जातात. संपर्क 8856860463