+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
नागीण या रोगाला शिंगल्स किंवा herpes zoster या नावांनी ओळखले जाते. नागीण आजारामध्ये शरीराच्या एक बाजूला पुरळ येतात, वेदना होतात, त्या पुरळमध्ये पाणी साठते. कांजण्याचा जो प्रकार असतो त्याच प्रमाणे नागीण आजार असतो. पण नागीण या आजाराविषयी योग्य माहिती पेक्षा गौरसमजच अधिक पसरले असल्या कारणाने गरजेपेक्षा जास्त बाऊ करने व भीती या आजाराविषयी मनात बाळगली जाते. नागीण आजारावर वेळीच योग्य उपचार केल्यास लवकर बरा होतो व काळजीचे काही कारण राहत नाही. नागीण आजार हा वेरिसेला जोस्टर या व्हायरस मुळे होतो. याच व्हायरस मुळे कांजण्या आजार देखील होतो. लहानपणी कांजण्याचा आजार अनेकांना होतो. हा आजार कालांतराने बारा झाला तरी याचे विषाणू शरीरातील मज्जारज्जू मध्ये छुप्या पद्धतीने वास्तव्य करून असतात. पुुढे जेव्हा केव्हा काही कारणास्तव या रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते हे विषाणू जागृत होतात व त्याचा परिणाम म्हणून नागीण हा रोग होतो. नागीण आजारात शरीरावर एका बाजूला किंवा शरीराच्या एकाच भागाला लाल पुरळ येतात. दोन दिवसांनी फोड येऊन त्यात पाणी जमा होते. हे पुरळ प्रचंड वेदनादायी असतात. नागीण उठलेल्या ठिकाणी प्रचंड आग होते. रुग्णाला हा त्रास असह्य होतो. वेळीच उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. नागीण झाल्यावर दोन तोंडं एकमेकांना जुळल्यास किंवा नागिणीने विळखा घातल्यास जीवास धोका असतो हा केवळ आणि केवळ गैरसमज आहे. मुळातच नागीण आजारात पुरळ शरीरातील एका भागाला किंवा एका नसेवर उठतात त्यामुळे ते जुळण्याचा किंवा विळखा मारण्याचा संभव होत नाही. क्वचितच दोन किंवा तीन नसांना या आजाराची लागण होते. मधुमेह, एड्स, केमोथेरपी, अशक्तपणा, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे, किंवा इतर आजारांमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती बऱ्याचदा कमी होते व नागीण आजार उदभवू शकतो. मुख्य लक्षणे नागीण आजारामध्ये नागीण ज्या जागी येणार ती जागा दुखायला सुरुवात येते. त्या जागेवर लाल पुरळ येण्यास सुरुवात होते. लाल पुरळमध्ये पाणी साठून भरपूर वेदना व्हायला सुरुवात होते. आग होणे, चणचण होणे असे त्रास होतात. साधारण दोन ते सहा आठवडे नागिणीचा त्रास होतो. कांजण्या मध्ये जसा ताप येतो तसे नागीण आजारातही ताप येतो. जिभेची चव निघून जाते. थकवा येतो. साधारण उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्यामुळे नागीण आजार होतो. या आजारात उष्णतेमुळे तोंड येते. तोंडाला फोड येतात. नागीण आजारात शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे लघवीचा त्रास वाढतो. वारंवार लघवीला येणे व लघवीची जागा दुखणे अशी लक्षणेही आढळून येतात. गोळ्या, औषधे व पथ्य पाळून हळूहळू नागीण आजार बरा होतो. साधारणपणे हे विषाणू नसांमार्फत पसरून पुढे बरगड्यांमधील चेतातंतूच्या रेषेवर पुरळ किंवा लाल फोडयांच्या रुपात पसरतात. कधी कधी हा आजार चेहऱ्यावर किंवा डोळ्यामध्येही होऊ शकतो. डोळ्यांमध्ये नागीण झाल्यास मात्र फार दक्षता घेण्याची गरज असते अन्यथा दृष्टी जाण्याची देखील संभावना असते. शरीराच्या एकाच बाजूवर, हातावर हा रोग आढळतो. नागीण आजारावर औषधोपचार नाहीत असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो त्यामुळे घरगुती काही उपचार चालू करतात पण त्यामुळे जखमा अजून चिघळण्याची शक्यता असते. नागीण झाल्याचे कळताच त्वचा डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार व गोळ्या घ्याव्यात. यावर काही मलम देखील दिले जातात ते वेळोवेळी पुरळ वर लावावे.पुरळ कमी होतात. होणारी आगही काही दिवसांत कमी होते. वेदना काही दिवस राहू शकतात. पण या तीव्र वेदना कमी झाल्या नाहीतर तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. शरीराची स्वच्छता राखावी. अति दगदग टाळावी. स्वतःचे कपडे, साबण, टॉवेल असे साहित्य स्वतंत्र ठेवावे व इतर कोणालाही वापरू देऊ नये. हलका आहार घ्यावा. गोळ्यांचा डोस पूर्ण करावा. अधिक माहिती व उपचारांसाठी संपर्क डॉ धंदुके गुरुकृपा क्लिनिक वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे 8856860463